पुणे – नॉन बँकिंग वित्तीय सेवा देणार्या बजाज फायनान्स आस्थापनाला NBFC प्रॅक्टिस कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपये दंड आकारला आहे. कर्जाची रिकव्हरी आणि वसुली करतांना चुकीच्या पद्धतीचा वापर होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्याने रिझर्व्ह बँक कायद्यानुसार ही कारवाई केली आहे, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.