गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद

नारायणगाव (पुणे) – पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गोवंशियांची अवैधपणे कत्तल करून ३ सहस्र ५०० किलो मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध टेम्पोचालक सुफियान अन्सारी आणि अश्फाक मोहम्मद यांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर राजेंद्र यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती.