नगर येथील आरोग्य विभागातील औषधाच्या साठ्याभोवती कचर्‍याचा ढीग

नागरिकांच्या आरोग्याशी अशा प्रकारे हेळसांड केली जाणे यातूनच संबंधित अधिकार्‍यांची बेफिकीर वृत्ती दिसून येते !

नगर – येथील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषदेचे ५० अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी इमारती बांधण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषधे ठेवण्यास जागा नसल्याने या इमारतींच्या जवळील बॅडमिंटन हॉलचा वापर काही वर्षांपासून औषधे ठेवण्यासाठी केला जातो; मात्र सध्या या औषध साठ्याला सर्व बाजूंनी कचर्‍याच्या ढिगाने वेढले आहे. या परिसरात अनेक अधिकारी रहात असूनही जिल्हा प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी खेद व्यक्त केली आहे.