गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध तडीपार

धर्मांध लाल अहमद महिबूब कुरेशी

सोलापूर – येथील गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध लाल अहमद महिबूब कुरेशी याच्यावर गुन्हा नोंद होता. त्याचे अवलोकन करून जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयास तडीपार प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर कुरेशी याची विविध स्तरांवर चौकशी होऊन पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोलापूर यांनी त्यास सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका येथून एक वर्षासाठी तडीपार आदेश जारी केला आहे. २ जानेवारी या दिवशी आदेशाची कार्यवाही करून कुरेशी याला जिल्हा कलबुर्गी (गुलबर्गा), राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आले.

सोलापूर शहरातील गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या इसमांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत. जेलरोड पोलीस ठाणे परिसरात विजापूर वेस आणि राहुल गांधी झोपडपट्टी परिसरात कुरेशी लोकांकडून अशा प्रकारे वाहतूक करण्यात येते. या लोकांवर वेळोवेळी गुन्हेही नोंद झालेले आहेत. (गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर तात्काळ कारवाई केल्यासच अवैध वाहतुकीवर निर्बंध बसेल. – संपादक)