गांधी बकरीला माता मानत होते, यामुळे हिंदूंनी तिचे मांस खाऊ नये ! – चंद्रकुमार बोस

मोहनदास गांधी कोलकातामध्ये माझे आजोबा शरतचंद्र बोस यांच्या घरी निवासाला आल्यावर बकरीचे दूध मागत. त्यासाठी २ बकर्‍या आणल्या होत्या. बकरीचे दूध पित असल्याने ते तिला माता मानत होते.

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांना अटक

२७ जुलैला रात्री येथे भाजपचे नेते शक्तीपदा सरदार यांच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

बंगालमध्ये भाजप नेत्याची हत्या

मंदिरबाजार भागामध्ये अज्ञात आक्रमणकर्त्यांनी भाजपचे स्थानिक नेते शक्तीपद सरदार (वय ४५ वर्षे) यांची चाकूने वार करून हत्या केली.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जाणार्‍या भाजप समर्थकांकडून पोलिसांना मारहाण

१६ जुलैला झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या वेळी भाजप समर्थकांनी पोलिसांना मारहाण केली.

बंगालमध्ये पूजा करणेही कठीण ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तुम्हाला विरोध करणार्‍यांची हत्या करा, असा गटच बंगालमध्ये निर्माण करण्यात आला आहे. या गटाच्या अनुमतीविना येथे पानही हलत नाही. इतकेच काय येथे सामान्य माणसाला पूजा करणेही कठीण होऊन बसले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर केली.

बंगालमध्ये हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ म्हटल्याने मुसलमान मुख्याध्यापकाची त्यांना अमानुष मारहाण

मुसलमानबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शक्तीपूरमध्ये असणार्‍या कुमार माहिमचंद्र इन्स्टिट्यूट या शाळेतील मुख्याध्यापक अफिकुल आलम यांनी ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्‍या आणि मनगटावर लाल धागे बांधलेल्या ४ हिंदु विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली.

शाळेच्या बसमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून ११ वीच्या विद्यार्थ्याला १२ वीच्या विद्यार्थ्याने चाकूने भोसकले

मुलीच्या शेजारी बसण्याच्या वादातून ११ वीच्या विद्यार्थ्याला शाळेच्या बसमध्येच भोसकण्यात आले. यात विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाला.

तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ मालिकेच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेकडून निदर्शने

खासगी दूरचित्रवाहिनीवरील तमिळ भाषेतील ‘बिग बॉस’ या मालिकेतून तमिळ संस्कृतीचा अवमान होत असल्याच्या कारणावरून याच मालिकेचे सूत्रधार अभिनेते कमल हसन यांच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने विजया टीव्ही वाहिनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

बंगालमधील तलावामध्ये हात आणि पाय बांधलेल्या स्थितीत भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला !

येथे भाजपचे ५४ वर्षीय कार्यकर्ते धर्मराज हजरा यांचा हात आणि पाय बांधलेल्या स्थितीतील मृतदेह येथील शक्तीपुरा गावातील एका तलावात सापडला. यापूर्वी गेल्या मासात पुरूलिया जिल्ह्यात भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याच्या …….

पालकांनी भ्रमणभाष संचावर अश्‍लील चित्रपट पहाण्यास दिले नाहीत म्हणून मुलाची आत्महत्या

भ्रमणभाष संचावर अश्‍लील चित्रपट पहाण्यास पालकांनी दिले नाही आणि भ्रमणभाष काढून घेतल्याच्या रागातून येथील सैकत बोरल या १६ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.


Multi Language |Offline reading | PDF