Gyanvapi Case : (म्हणे) ‘जर कुणी मशिदीला मंदिरात रूपांतरित करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही !’ – जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी

जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी यांची धमकी !

जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी

कोलकाता (बंगाल) – ज्ञानवापीत बळजबरीने ते लोक (हिंदु भाविक) घुसले असून तिथे पूजा करण्यास आरंभ केला आहे. त्यांनी तात्काळ ज्ञानवापीवरील नियंत्रण सोडावे. आम्ही कधी कोणत्या मंदिरात नमाजपठणासाठी जातो का ? (खोटे बोला; पण रेटून बोला, अशा मनोवृत्तीचे धर्मांध मुसलमान ! – संपादक) मग ते लोक आमच्या मशिदीत का आले ? मशीद ही मशीद असते. जर कुणी मशिदीला मंदिरात रूपांतरित करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. हे आम्ही होऊ देणार नाही, अशी धमकी जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी येथे दिली.

चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कोलकोता येथे मोर्चा काढत ज्ञानवापीतील हिंदूंच्या पूजा करण्याला विरोध करण्यात आला. ‘योगी आदित्यनाथ कोणता निर्णय घेत आहेत, याची त्यांना कल्पना नाही. जर ते आज बंगालमध्ये कुठेही असते, तर आम्ही त्यांना बाहेर जाऊ दिले नसते’, अशीही धमकी चौधरी यांनी या वेळी दिली.

संपादकीय भूमिका

  • याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! हिंदूंच्या मंदिराला मशिदीत रूपांतरित करण्यात आल्या असतांना त्या पुन्हा हिंदूंना सोपवण्याऐवजी ‘माझे ते माझे आणि तुझेही माझे’ अशा वृत्तीचे धर्मांध !
  • न्यायालयाच्या आदेशाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात हिंदूंनी पूजा प्रारंभ केली आहे. चौधरी अशा प्रकारची धमकी देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !