मोहरममुळे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन पुढे ढकलण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या फतव्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहरमच्या मिरवणुकांना अडथळा होऊ नये, यासाठी राज्यातील दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन पुढे ढकलण्याचा निर्णय कुठलाही कायदा अथवा कायदेशीर नियम न बनवता ट्विटरवर घोषित केला होता.

हावडा (बंगाल) येथील कमर अली यांच्या दुकानातून १४ बॉम्ब जप्त

पोलिसांनी हावडा येथील एका दुकानातून १४ बॉम्ब जप्त केले आहेत. १३ सप्टेंबरला येथे झालेल्या एका स्फोटात दुकानाचा मालक कमर अली हा गंभीररित्या घायाळ झाला होता.

मानवाधिकारांच्या शूरविरांनी एकदातरी बंगालधील हिंसाचाराचे वार्तांकन करावे ! – अमित शहा, भाजपचे अध्यक्ष

मानवाधिकाराच्या शूरविरांनी देहलीतून बाहेर पडून बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून भाजप कार्यकर्त्यांवरील आक्रमणांच्या घटनांना समोर आणले पाहिजे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यानंतर अमित शहा यांच्या कोलकाता येथील कार्यक्रमाला सभागृह देण्यास नकार !

भाजपचे अध्यक्ष अमित शहा ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत बंगालच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यामध्ये १२ सप्टेंबर या दिवशी अमित शहा यांच्या कार्यक्रमासाठी येथील नेताजी इनडोर स्टेडियमचे आरक्षण केले होते; परंतु स्टेडियममध्ये काही काम चालू असल्याने कार्यक्रमासाठी अनुमती दिली नाही.

दसर्‍याच्या दिवशी बंगालमध्ये विहिंप आणि बजरंग दल त्रिशुळाचे वाटप करणार !

दसर्‍याच्या दिवशी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी त्रिशुळ वाटण्याची सिद्धता चालू केली आहे. बंगालमधील विहिंपचे प्रसारमाध्यम प्रमुख सोरिश मुखर्जी यांनी ही माहिती दिली.

मुसलमान माकप नेत्याने संघाच्या नेत्याचे समर्थन केल्यावर पक्षाकडून नोटीस

रा.स्व. संघाचे विचारवंत राकेश सिन्हा यांच्या समर्थनार्थ एक महिन्यापूर्वी ट्विट केल्यावरून माकपचे नेते अमीर हैदर जेदी यांना पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यात त्यांना विचारण्यात आले आहे की, तुम्ही हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे का ?

बंगालमध्ये जिहाद्यांच्या आक्रमणात ‘हिंदु संहति’च्या कार्यकर्त्याची हत्या

बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामध्ये सशस्त्र जिहाद्यांनी हिंदु वस्तीवर केलेल्या आक्रमणात ‘हिंदु संहति’चा कार्यकर्ता टोटन दास ठार झाला, तर अन्य एक तरुण कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला.

सभागृहाची नोंदणी रहित करण्यात आल्याने सरसंघचालक भागवत यांचा कोलकाता येथील कार्यक्रम रहित !

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा कार्यक्रम होणार होता. यासाठी एक शासकीय सभागृह कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आलेे होते

गाय चोरल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू

धुपगुरी गावाजवळ हफीझुल शेख आणि अन्वर हुसेन या दोघांनी गाय चोरल्याच्या संशयावरून जमावाने त्यांना मारहाण केली. यात या दोघांचा मृत्यू झाला.

बीरभूम (बंगाल) येथे झालेल्या स्फोटात तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्याचे घर उद्ध्वस्त

बीरभूम जिल्ह्यातील बाराबन गावात तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आयनस यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचे घर उद्ध्वस्त झाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now