बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा कुटुंबियांचा आरोप
मालदा (बंगाल) – मालदा जिल्ह्यातील मोथाबारी परिसरात १५ फेब्रुवारी या दिवशी स्वतःच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मक्याच्या शेतात २५ वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. कल्पना मंडल असे पीडितेचे नाव आहे. श्री सरस्वतीदेवीच्या पूजेच्या म्हणजे १४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ती बेपत्ता झाली होती. या तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा संशय तिच्या कुटुंबियांना आहे. मृताच्या शरिरावर आक्रमणाच्या खुणा आणि चाकूच्या अनेक जखमा असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या घटनेविषयी भाजपच्या आयटी शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंगाल महिलांसाठी नरक बनला आहे. असा एकही दिवस जात नाही की, जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या होत नाही.
West Bengal, under Mamata Banerjee, has become hell for women… Not a day goes when a woman is not raped and murdered. The brutality of the crime is often so spine chilling that one can’t sleep for days. But nothing affects Mamata Banerjee, as long as she keeps getting the… pic.twitter.com/bREGJop4Mb
— Amit Malviya (@amitmalviya) February 15, 2024
गुन्ह्याची क्रूरता अनेकदा इतकी भयानक असते की, अनेक दिवस झोप येत नाही; पण जोपर्यंत ममता बॅनर्जी यांना मते मिळत रहातील, तोपर्यंत त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कोणत्याही गुन्हेगारावर कधीही कारवाई होत नाही; कारण ते नेहमीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी जोडलेले असतात. ममता बॅनर्जी बंगालच्या महिलांसाठी शाप आहेत, असा आरोप त्यांनी केला.
संपादकीय भूमिकाबंगालच्या संदेशखाली येथे हिंदु महिलांवर तृणमूल काँग्रेसचा मुसलमान नेता आणि कार्यकर्ते यांच्याकडून लैंगिक शोषणाची घटना उघड झाली असतांना आता अशा प्रकारच्या घटना समोर येणे यातून बंगाल हिंदु महिलांसाठी पाकिस्तान आणि बांगलादेश झाला आहे, हेच स्पष्ट होते ! |