गाझियाबाद न्‍यायालयात घुसला बिबट्या !

येथील न्‍यायालय परिसरात अचानक बिबट्या घुसल्‍याने गोंधळ उडाला. यामुळे एका पोलिसासह ६ हून अधिक लोक घायाळ झाले. बिबट्या घुसल्‍याची माहिती सर्वत्र पसरल्‍यावर अधिवक्‍त्‍यांनी त्‍यांची कार्यालये बंद केली.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात सनातनचे योगदान मोठे ! – अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, आदित्‍य वाहिनी

‘आदित्‍य वाहिनी’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्‍ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.

शालेय अभ्‍यासक्रमामध्‍ये अध्‍यात्‍माचा समावेश आवश्‍यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘राधा माधव इंटर महाविद्यालया’मध्‍ये शिक्षकांना ३० जानेवारी या दिवशी केले. या मार्गदर्शनाचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला.

सुनावणीच्या वेळी भगवान केशव महाराज यांची मूर्ती न्यायालयात उपस्थित !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी भगवान केशव महाराज यांची मूर्ती न्यायालयात आणण्यात आली. या प्रकरणात २३ जानेवारी या दिवशी सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने या प्रकरणातील ६ क्रमांकाचे वादी भगवान केशव महाराज हे अनुपस्थित नसल्याचे म्हटले होते.

लखनौचे लवकरच नामांतर होणार !

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याची राजधानी लखनौचे नामांतर करण्याविषयी विधान केले आहे. येथे पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.

(म्हणे) ‘समान नागरी कायदा घटनाविरोधी ठरेल !’ – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा दावा !

वाराणसीच्या एका गावातील हनुमान मंदिरात अज्ञातांकडून मूर्तींची तोडफोड !

इस्लामी देशांत नव्हे, तर हिंदुबहुल भारतात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ठरतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीची अवैध वीजजोडणी तोडली !

मुळात तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नव्हते का ?

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे विश्वविद्यालयाच्या बसमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

पोलिसांनी या घोषणांच्या प्रकरणी शोभन आणि अहमद  शबाब मलिक या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. अशांना आता दिवाळखोर पाकिस्तानमध्ये पाठवणे हीच कठोर शिक्षा ठरील !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

अशा घटनांत अशीच आणि इतक्याच जलद गतीने शिक्षा होत राहिली, तर गुन्हेगारांना गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा लागेल !