दारुल उलूम देवबंद शिक्षण संस्थेने दाढी केलेल्या ४ विद्यार्थ्यांची केली हकालपट्टी !

सर्व विद्यार्थ्यांना दाढी वाढवण्याचा आदेश !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील दारूल उलूम देवबंद या संस्थेतील शिक्षण विभागाचे मौलाना (इस्लामचा अभ्यासक) हुसैन अहमद यांनी एक आदेश जारी केला आहे. या आदेशात हे स्पष्ट करण्यात आले आहे, ‘जो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला आहे त्याने दाढी काढू नये. जो विद्यार्थी दाढी काढेल त्याची हकालपट्टी करण्यात येईल. जो विद्यार्थी दाढी काढून प्रवेश घ्यायला येईल, त्याला प्रवेश दिला जाणार नाही.’ दाढी काढलेल्या ४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.


ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य आणि लक्ष्मणपुरीचे काझी (शरीयत कायद्यानुसार न्यायदान करणारा) मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी म्हटले आहे की, महंमद पैगंबर दाढी ठेवत असत. त्यामुळे इस्लाममध्ये दाढी ठेवणे हे महत्त्वाचे मानले जाते. इस्लाममध्ये दाढीला पुष्कळ महत्त्व आहे.