काळ्या आणि पांढर्‍या बुरशीनंतर आता सापडला पिवळ्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण !

काळ्या आणि पांढर्‍या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.  

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील प्रशासनाने अवैध मशीद पाडल्याचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्याकडून विरोध

त्यांचा दावा आहे की, ही मशीद १०० वर्षे जुनी होती आणि तिचा मालकी हक्क वक्फ बोर्डाकडे होता. याची नोंदणीही बोर्डाकडे आहे.

कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे ईदला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या मौलाना आणि त्याच्या ३ सहकार्‍यांना अटक !

अशा देशद्रोह्यांना सरकारने तात्काळ पाकिस्तानमध्ये हाकलून दिले पाहिजे ! भविष्यात पाकविरुद्ध युद्ध झाल्यास असे धर्मांध कुणाच्या बाजूने असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! घरातील अशा शत्रूंना शोधून त्यांचा बंदोबस्त सरकार आता तरी करणार का ?

गंगा नदीतून वाहून येणार्‍या मृतदेहांवर पोलिसांकडून टायर आणि पेट्रोल यांद्वारे अंत्यसंस्कार !

उत्तरप्रदेशमधील वाराणसी, गाजीपूर आणि बलीय, तसेच बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहून आल्याचे प्रकार घडले.

उत्तरप्रदेशच्या गावांतील आरोग्यव्यवस्था ‘राम भरोसे’ ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्यातील गावांमध्ये आरोग्यव्यवस्था ‘राम भरोसे’ चालली आहे. वेळ असतांना यात पालट न करणे, याचा अर्थ आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रित करण्यासारखे आहे, अशा शब्दांत एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला कोरोनावरून फटकारले आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू न केल्यास आत्मदहन करीन ! – जगद्गुरु परमहंसाचार्यजी महाराज, अयोध्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंसाचारात ज्यांची घरे जाळण्यात आली आहे, त्यांना घरे बांधून द्यावीत आणि बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे. ही मागणी मान्य न झाल्यास २५ मे या दिवशी मी याच चितेवर बसून स्वत:ला अग्नीच्या स्वाधीन करीन.

चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात अटकेतील गुंडाने केलेल्या गोळीबारात २ गुंड ठार !

उत्तरप्रदेशात बाहेरील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत, त्यात आता कारागृहातही तीच स्थिती पोलिसांना लज्जास्पदच  होय !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे दळणवळण बंदीचे उल्लंघन करणार्‍या मशिदीच्या इमामाला पोलीस अधिकार्‍याने चोपले !

धर्मांधांच्या विरोधानंतर पोलीस अधिकारी नियंबित

कोरोनाबाधित मृताला खांदा देण्यासाठी २ सहस्र रुपये, तर नातेवाइकांना मुखदर्शन करण्यासाठी उकळले जातात १ सहस्र रुपये !

यावरून देशात भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हेच स्पष्ट होते ! मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या इतक्या असंवेदनशील लोकांना ‘माणूस’ तरी म्हणता येईल का ?

महाराजगंज (उत्तरप्रदेश) येथील गावात कोरोनाला दूर करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ सूर्यदेवतेला दिले जात आहे अर्ध्य !

शासकीय यंत्रणा जनतेचे रक्षण करू शकत नसल्याने आता हिंदूंना देवालाच शरण जाणे भाग पडत आहे, त्याचेच हे एक उदाहरण !