वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाराणसी – गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली गोध्रा दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करून भारताची प्रतिमा मलिन करणारे ‘बीबीसी न्यूज’ अन् अन्य दोषींवरही कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘इंडिया विथ विजडम्’चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता मदन मोहन यादव, अधिवक्ता रोहित मौर्य, अधिवक्ता श्याम वर्मा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी, सनातन संस्थेचे श्री. प्रमोद गुप्ता आणि धर्मप्रेमी श्री. रितेश गुप्ता आदी उपस्थित होते.
या वेळी ‘हिंदु धर्म, देवीदेवता, ग्रंथ आणि थोर राष्ट्रपुरुष यांचा अवमान थांबवण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करण्यात यावा’, अशीही मागणी वरील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.