हिंदुद्वेषी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वाहनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेकली काळी शाई !

वाराणसी – ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी करणारे समाजवादी पक्षाचे सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांना येथील रामनगर भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, तसेच त्यांच्या वाहनावर काळी शाई फेकली.

या वेळी ‘जय श्रीराम’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपचे नेते दीपक सिंह राजवीर यांनी सांगितले की, स्वामी प्रसाद मौर्य यांनी श्रीरामचरितमानसविषयी केलेल्या हिंदुद्वेषी विधानावरून क्षमा मागितली पाहिजे.

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेषी विधाने करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्‍या मौर्य यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे आवश्यक होते !