पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती  

मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शिवभक्तांनी स्वत:ची काळजी घेत शिवजयंती साजरी करावी ! – खासदार उदयनराजे भोसले

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी प्रथम जनतेची काळजी घेतली असती. त्याप्रमाणे नागरिकांची काळजी घेणे आपले स्वत:चे आणि शासनाचे दायित्व आहे.

सातारा येथील शासकीय निवासस्थानातील घरांची दारे, खिडक्या आणि चौकटी यांची चोरी

शासकीय निवासस्थानेच असुरक्षित असतील तर सामान्यांच्या घराचे काय ?

(म्हणे) ‘भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही !’ – शेतकरी नेते राकेश टिकैत यांची टीका

समाजविघातक शक्तींना शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेणारे, देशद्रोही खलिस्तानवाद्यांच्या जिवावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरणारे कथित शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रभु श्रीरामचंद्रांविषयी काही बोलणे, हेच मुळात हास्यास्पद आहे !

कोरोनाची दुसरी लाट आल्यास सावरायलाही वेळ मिळणार नाही !

‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी मढ येथील मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी प्रतिकूल परिस्थितीत सशस्त्र लढा उभारला ! – शरद फडके

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १३८ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना १७ फेब्रुवारी या दिवशी आदरांजली वहाण्यात आली.

देहलीच्या सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्याने पोलिसांवर तलवारी आक्रमण करत पळवली पोलिसांची गाडी !

आक्रमणात घायाळ झालेल्या पोलीस अधिकार्‍याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हरप्रीत सिंह असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर थोड्या वेळाने पोलिसांनी त्याला अटक केली. 

३१ वर्षांनंतर उघडण्यात आले श्रीनगरमधील शीतलनाथ मंदिर !

जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.

देहली हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य आरोपी मनिंदर सिंह याला अटक : २ तलवारी जप्त

गुन्ह्यांच्या प्रकरणी आरोपींना अटक झाल्यावर त्याचे खटले वर्षानुवर्षे चालत रहातात. या काळात आरोपी जामीनावरही सुटतो; मात्र त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्प रहाते. या घटनेतही तसेच होऊ नये !