
मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी मढ येथील मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
याविषयी प्रतिक्रिया देतांना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘‘मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे काहीही अनुमान लावू नका. मोहन भागवत यांसमवेत मी आध्यात्मिक अंगाने जोडलो आहे. वर्ष १९८०-१९९० या दशकात मिथुन चक्रवर्ती हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. ते मूळचे बंगाली अभिनेते असून तिथे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मिथुन चक्रवर्ती राज्यसभेत खासदार होते. अनेक काळ ते बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये होते. २०१६ मध्ये प्रकृतीचे कारण देऊन त्यांनी पदाचे त्यागपत्र दिले होते.
Maharashtra: RSS chief Mohan Bhagwat meets actor Mithun Chakraborty at the latter’s residence in Mumbai. Visuals from outside his residence. pic.twitter.com/U3LIkLG8Tv
— ANI (@ANI) February 16, 2021
( सौजन्य : Mumbai Dakshata )
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !