समाजविघातक शक्तींना शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेणारे, देशद्रोही खलिस्तानवाद्यांच्या जिवावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरणारे कथित शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रभु श्रीरामचंद्रांविषयी काही बोलणे, हेच मुळात हास्यास्पद आहे !

रोहतक (हरियाणा) – श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही. भाजपवाल्यांनी म. गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही ‘आंदोलनजीवी’ करून टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधानासाठी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. रोहतकमधील शेतकर्यांना संबोधित करतांना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तरप्रदेशनंतर आता बंगालमध्ये किसान महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनाला विरोध करणार्यांना मते देऊ नका, असे आवाहन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन