क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी प्रतिकूल परिस्थितीत सशस्त्र लढा उभारला ! – शरद फडके

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना आदरांजली वहातांना राष्ट्रप्रेमी

सांगली, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १३८ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना १७ फेब्रुवारी या दिवशी आदरांजली वहाण्यात आली. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक श्री. महेश कराडकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी फडके स्नेह मंडळाचे श्री. शरद फडके म्हणाले, ‘‘क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी प्रतिकूल परिस्थितीत सशस्त्र लढा उभारला. आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा.’’

या वेळी सर्वश्री स्वरूप वाटवे, संदीप थोरात, किशोर साळुंखे, सूर्यकांत लोंढे, राकेश पाटोळे, केशव पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर आदी उपस्थित होते. जिजामाता बालमंदिरमधील विद्यार्थ्यांनी समूहगीत गायले.

विशेष

गेली अनेक वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन श्री. शरद फडके (वय ८१ वर्षे) हे निरपेक्ष वृत्तीने आणि निष्ठेने करत आहेत. श्री. फडके यांच्या पाठपुराव्यामुळेच या चौकाचे ‘क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक’, असे नामकरण झाले. याचसमवेत प्रतिवर्षी जिल्हा नगर वाचनालय येथे देण्यात येणारा क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पुरस्कार श्री. फडके यांनी प्रायोजित केला आहे.