नवी देहली – देहलीच्या ३ वेगवेगळ्या सीमेवर शेतकरी आंदोलन चालू असतांना सिंघू सीमेवर आंदोलनात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने पोलीस अधिकार्यावर तलवारीने वार करून तेथील पोलिसांची गाडी घेऊन पलायन केल्याची घटना घडली. आक्रमणात घायाळ झालेल्या पोलीस अधिकार्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हरप्रीत सिंह असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर थोड्या वेळाने पोलिसांनी त्याला अटक केली.