कोल्हापुरात होणार अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन सोहळा

धर्मगुरूंचे सानिध्य, तसेच बांगलादेश आणि नेपाळ येथील महासंघाच्या पदाधिकार्‍यांची विशेष उपस्थिती. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येणार आहे

 मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे ! – रामराजे नाईक-निंबाळकर

मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, तसेच नवीन माध्यमांचा अधिकाधिक विनियोग करून कसोशीने प्रयत्न करायला हवेत, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताकदिनी संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानंतर २६ जानेवारी या दिवशी भूमीच्या वादातून अनिल शिवाजी कदम या ज्येष्ठ नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

लाचप्रकरणी शिर्डी येथील २ पोलीस अटकेत

१७ ते २५ जानेवारी या कालावधीत शिर्डीतील हॉटेलवर चालू असलेली कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यातील बाळासाहेब यशवंत सातपुते आणि प्रसाद पांडुरंग साळवे या २ पोलीस कर्मचार्‍यांना लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

सोलापूर जिल्ह्यातील बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी रुपयांचा निधी

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांत झालेल्या अतीवृष्टीमुळे सिंमेंटच्या बंधार्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्‍यांचे बांध वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या.

कोरोना लस आणल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लस निर्माती आस्थापने यांचे सभागृहाकडून अभिनंदन !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरावावर चर्चा करतांना कोरोना महामारी चांगल्या रितीने हाताळल्याने संपूर्ण जग भारताकडे कौतुकाने पहात असल्याचे सांगितले.

नागपूर येथे ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याच्या प्रकरणी साहाय्यक आयुक्तांना अटक

९ लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक त्यांना केली आहे.

काठ्या आणि झेंडे घेऊन या ! – व्हिडिओद्वारे शेतकर्‍यांना चिथावणी

देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत टिकैत यांच्यासहित सर्व शेतकरी नेत्यांना कारारगृहात टाकणे अपेक्षित होते ! तसे न होणे, ही देहली पोलिसांची निष्क्रीयताच म्हणावी लागेल !

देहलीत हिंसाचार भडकावल्याचा कुख्यात गुंड लक्खा सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप !

एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्‍यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !

दीप सिद्धू याच्याशी माझे संबंध नाहीत ! – भाजपचे खासदार सनी देओल यांचे स्पष्टीकरण

मी अगोदरही ६ डिसेंबर या दिवशी ट्वीट करून हे स्पष्ट केले आहे की, माझा किंवा माझ्या कुटुंबियांचा दीप सिद्धू याच्याशी कोणताही संबंध नाही, असे ट्वीट भाजपचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी केले आहे.