देहलीतील हिंसाचारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ प्रसारित
देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत टिकैत यांच्यासहित सर्व शेतकरी नेत्यांना कारारगृहात टाकणे अपेक्षित होते ! तसे न होणे, ही देहली पोलिसांची निष्क्रीयताच म्हणावी लागेल !
नवी देहली – ‘ऐकत नाही. अधिकच निष्ठुर झाले आहे सरकार. झेंडा घेऊन या आणि स्वतः समवेत काठ्याही ठेवा. समजून जा सार्या गोष्टी. ठीक आहे ? आता फार झाले. तिरंग्यासमवेत आपला झेंडाही आणा. भूमी वाचवायला या’, अशी विधाने असणारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पोस्ट केला आहे; मात्र हा व्हिडिओ कोणत्या दिवसाचा आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
१. टिकैत यांचा हा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की, मी आंदोलनकर्त्यांना दांडे आणि झेंडे घेऊन देहलीत येण्याचे आवाहन केले होते; मात्र याचा उद्देश हिंसाचार करण्याचा नव्हता. देहलीत हिंसाचार करणारे गावातील अशिक्षित शेतकरी होते. त्यांना देहलीतील मार्ग ठाऊक नव्हते. जे लोक हिंसाचार करत आहेत त्यांनी आंदोलन सोडून निघून जावे. ज्यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला, त्यांना शिक्षा भोगावी लागेल. हे शिखांचे नाही, तर शेतकर्यांचे आंदोलन आहे.
२. टिकैत यांनी पंजाबी गायक दीप सिद्धू याच्याशी कोणताही संबंध नसल्याचेही या वेळी सांगितले. ते म्हणाले की, दीप सिद्धू यांचे पंतप्रधानांसमवेत छायाचित्र आहे.
(सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )