सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समयमर्यादेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके फोडल्यास १ सहस्र रुपये दंड

‘कृती योजने’चे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्यास अधिकाधिक १ लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो

सिंधुदुर्गात गत २४ घंट्यांत कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३३ झाली आहे.

वेळागर (वेंगुर्ले) येथील समुद्रात बुडून कारवार येथील तरुणाचा मृत्यू

अंघोळीसाठी पाण्यात जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ महिला शौर्यजागृती शिबिराचे आयोजन

आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय ‘ऑनलाईन‘ महिला शौर्यजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

दीपावलीनिमित्त कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींना पू. रमानंद गौडा यांनी केले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

आपत्काळात दिवाळी कशी साजरी करावी ? आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी राज्यातील विविध धर्मप्रेमींना नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले.

मालवण येथील ऐतिहासिक पालखी सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा !

ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्‍वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांत गर्दी : कोरोनाचे नियम धाब्यावर !

कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.

देशातील घाऊक महागाईच्या दरात गेल्या ८ मासांत सर्वाधिक वाढ

देशातील ऑक्टोबर मासातील घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांनी वाढून १.४८ टक्क्यांंवर पोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसर्‍यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या ८ मासांतील सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.

२५० ते ३०० जिहादी आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत ! – सीमा सुरक्षा दलाची माहिती

गेल्या दोन प्रसंगांत या आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करून मोठी हानी केल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले. यातून आपण अजूनही बचावात्मक धोरण राबवत आहोत, जे चुकीचे आहे.

सनातनचे ग्रंथ अध्यात्मातील दीपस्तंभ ! – आमदार महेश शिंदे, शिवसेना, कोरेगाव

दीपावलीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी सनातनच्या ३०० ग्रंथांची मागणी केली आणि वरील उद्गार काढले.