मंगळुरू (कर्नाटक) – आपत्काळात दिवाळी कशी साजरी करावी ? आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी राज्यातील विविध धर्मप्रेमींना नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले. या वेळी पू. रमानंद गौडा यांनी दिवाळीचा इतिहास, दिवाळी सणाचे महत्त्व, ती कशी साजरी करावी ? हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कसे कार्य करावे ? दीपावलीच्या काळात कसा भाव ठेवावा, याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाला कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ता, जिज्ञासू अशा एकूण ७५० हून अधिक जणांची ‘ऑनलाईन’ उपस्थिती होती.
या मार्गदर्शनानंतर जिज्ञासूंनी ‘आम्हाला दिवाळी साजरी करण्याविषयीची मौल्यवान माहिती मिळाली’, असा अभिप्राय व्यक्त केला. याचसमवेत दीपावली, लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी, यमदीपदान यांविषयी अनेक जिज्ञासूंनी शंकानिरसन करून घेतले.