प्रत्येक हॉटेलने एक खोली अलगीकरणासाठी ठेवणे बंधनकारक ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

हॉटेलमध्ये आलेला पर्यटक कोरोनाबाधित झाल्यास त्याला अलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्येक हॉटेल चालकाला हॉटेलमधील एक खोली अलगीकरण सुविधेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असणार आहे.

कणकवलीत भटक्या कुत्र्यांवर नगरपंचायतीची उपाययोजना

कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेले काही दिवस वाढला आहे. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने कृती आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. कणकवलीतील भटके कुत्रे पकडून त्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पर्वरीवासियांचा सा.बां. खात्याच्या कार्यालयावर मोर्चा

आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक पर्वरीवासियांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी येथील कार्यालयावर मोर्चा नेला. पर्वरी परिसरात गेले काही मास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्याने हा मोर्चा नेण्यात आला.

उसगाव वडाकडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन ठार

उसगाव वडाकडे येथे एका अज्ञात वाहनाने १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चालक पाळी येथील चंद्रकांत धाली आणि मागे बसलेली पाळी येथील आलिशा फर्नांडिस यांचे जागीच निधन झाले.

वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य

तालुक्यातील लोरे क्रमांक २, दुधमवाडी येथील लवू वसंत मांडवकर हे शेतात काम करत असतांना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना २७ जून २०२० या दिवशी घडली होती.

अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या युवकाला अटक

अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका युवकाला निवती पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सुवर्णा श्रीकांत जाधवर (वय ४८ वर्षे) यांचे १५ नोव्हेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, १ मुलगा, २ मुली, असा परिवार आहे. सनातन परिवार जाधवर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (वय ७८ वर्षे) यांचे १८ नोव्हेंबर या दिवशी बिहार येथे वृद्धापकाळाने निधन झाले. सौ. मृदुला सिन्हा यांनी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्याचे राज्यपालपद भूषवले होतेे.

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची कार्यवाही १ जानेवारीपासून

गोव्यात नवीन ‘मोटर वाहन कायद्या’ची १ जानेवारी २०२१ पासून कार्यवाही करण्यात येणार आहे. ही दिनांक आणखी पुढे ढकलता येणार नाही, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.

देहलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा करण्यास देहली उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली !

कोरोनाच्या संकटामुळे देहली उच्च न्यायालयाने यमुना नदीच्या घाटांवर छठ पूजा करण्याची अनुमती नाकारली आहे. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही धर्माचा सण साजरा करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम जीवित रहायला हवे.