वेळागर (वेंगुर्ले) येथील समुद्रात बुडून कारवार येथील तरुणाचा मृत्यू

वेंगुर्ले – तालुक्यातील वेळागर (शिरोडा) येथील समुद्रात अंघोळीसाठी गेलेला कारवार येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला, अशी नोंद शिरोडा पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.

कारवार येथील नित्यानंद जयवंत गौडा हा युवक त्याच्या मित्रांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला होता. १५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सर्वजण वेळागर समुद्रकिनारी आले होते. तेथे नित्यानंद अंघोळीसाठी समुद्रात गेला. दुपारची वेळ असल्याने किनार्‍यावर कुणीही नव्हते. अंघोळीसाठी पाण्यात जातांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.