देशातील घाऊक महागाईच्या दरात गेल्या ८ मासांत सर्वाधिक वाढ

नवी देहली – देशातील ऑक्टोबर मासातील घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांनी वाढून १.४८ टक्क्यांंवर पोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसर्‍यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या ८ मासांतील सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.

अन्नपदार्थांच्या घाऊक बाजारातील महागाईच्या दरामध्ये घट झाल्यानंतरही घाऊक आणि किरकोळ मूल्याच्या दृष्टीने चिंता कायम आहे. तज्ञांच्या मते अन्नपदार्थांचा महागाई दर आता भाजीपाला आणि फळे यांखेरीज अन्य वस्तूंवर पडू लागला आहे. अशा परिस्थितीत पुढच्या दिवसांमध्ये याचा प्रभाव व्याज दरांवर पडू शकतो.