महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ !

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. कोरोनामुळे २५ मार्च या दिवशी दोघांचा मृत्यू झाला, तसेच नवीन ४३७ कोरोनाचे रुग्ण आढळले.

दुर्बल घटकांवरील रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा झाल्यास ठरणार विधानसभेचा अवमान !

दुर्बल घटकांवरील रुग्णांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा होणे, हे संबंधितांच्या असंवेदनशीलतेची परिसीमा आहे !

गोवा : हणजूण समुद्रकिनारपट्टीत २७५ अवैध  बांधकामे असल्याचे तपासणीत उघड

न्यायालयाने नागरिकाच्या याचिकेची नोंद घेऊन निर्देश दिल्यावर जाग्या झालेल्या प्रशासकीय यंत्रणा !

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

अधिवेशनामध्ये म्हादई प्रश्न, म्हादई अभयारण्य आणि इतर वनक्षेत्र यांना आग लागणे, कळंगुट खंडणी प्रकरण, अटल सेतू – वाहतुकीचा खोळंबा, ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प, अमली पदार्थांचा विळखा आदी प्रश्नांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

‘मेगा जॉब फेअर’वर २ कोटी ६१ लाख रुपयांचा व्यय

प्रत्येक सहभागीवर ३ सहस्र ६०० रुपये खर्च अवास्तव आहे आणि त्यामुळे अनावश्यक वस्तू काढून टाकून दरडोई १ सहस्र ५०० रुपयांपर्यंत मर्यादित खर्च करावा, असे वित्त विभागाने सुचवले. कार्यक्रम पार पडल्यानंतर वित्त विभागाची ही सर्व निरीक्षणे समोर आली आहेत.

#Exclusive : जळमटांनी माखलेले छत, प्रवेशद्वारावर कचरा आदी अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे अमरावती बसस्थानक !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे.

वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अजितसिंह बग्गा यांची वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

‘वाराणसी व्यापारी मंडळा’चे अध्यक्ष आणि ‘जनउद्योग व्यापारी मंडळा’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा यांनी वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित !

अधिवेशनात राज्यात अर्थसंकल्प संमत होण्यासमवेतच विधेयके संमत करण्यात आली. या अधिवेशनात सत्ताधार्‍यांनी कामकाज रेटून नेले, तसेच या अधिवेशनात संपूर्ण काळ सत्ताधार्‍यांचा वरचष्मा पहायला मिळाला.

मुंब्रा स्थानकात उतरलेल्या गर्दुल्ल्याने लोकलगाडीत प्रवाशावर जळता रूमाल फेकला, प्रवासी घायाळ

एका गर्दुल्ल्याने (नशेचे पदार्थ न मिळाल्यास वेडेपिसे होणारे) नशेसाठी वापरणारे द्रव्य रुमालावर टाकून त्याला आग लावली आणि तो रुमाल प्रमोद वाडेकर या दिव्यांग प्रवाशावर टाकला.

हिंदुत्व रक्षणासाठी जिहाद्यांच्या विरोधात कठोर कायदे आवश्यक ! – ह.भ.प. गणपत महाराज येसरे

हिंदुत्व रक्षणासाठी लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांच्या विरोधात आणि धर्मांतरबंदी यासाठी कायदा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणपत महाराज येसरे यांनी केले.