महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ !

मुंबई – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. कोरोनामुळे २५ मार्च या दिवशी दोघांचा मृत्यू झाला, तसेच नवीन ४३७ कोरोनाचे रुग्ण आढळले. सद्यःस्थितीत राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ सहस्र ९५६ वर पोचली आहे. पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक ५७१ रुग्ण आहेत. त्यानंतर रुग्णांची संख्या मुंबई आणि ठाणे येथे आहे.