मुंब्रा स्थानकात उतरलेल्या गर्दुल्ल्याने लोकलगाडीत प्रवाशावर जळता रूमाल फेकला, प्रवासी घायाळ

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंब्रा – छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या स्थानकांदरम्यान धावणार्‍या लोकलगाडीत २५ मार्च या दिवशी रात्री ११ वाजता दिव्यांग डब्यातील एका गर्दुल्ल्याने (नशेचे पदार्थ न मिळाल्यास वेडेपिसे होणारे) नशेसाठी वापरणारे द्रव्य रुमालावर टाकून त्याला आग लावली आणि तो रुमाल प्रमोद वाडेकर या दिव्यांग प्रवाशावर टाकला. यामुळे वाडेकर यांचा हात संपूर्णपणे भाजला. त्यांना के.ई.एम्. रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रुमाल टाकणारा गर्दुल्ला नंतर मुंब्रा स्थानकात उतरला.