रत्नागिरीत अत्याधुनिक कक्ष उभारणार ! – पालकमंत्री उदय सामंत

अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सिद्ध करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

लोकांच्या कल्याणासाठी अधिकार्‍यांनी तत्परतेने काम करावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अधिकार्‍यांना अशा सूचना का द्याव्या लागतात ! खरे तर अधिकार्‍यांनी स्वत:च लोकांच्या कल्याणासाठीच कामे करायला हवीत !

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

मंदिरात दर्शनासाठी येणारे हिंदू, तसेच पर्यटक यांची वेशभूषा पहाता मंदिराच्या चैतन्याचा त्यांना लाभ होण्याला आणि मंदिराच्या सात्त्विकतेला बाधा येते. त्यामुळे मंदिरांसाठी वस्त्रसंहिता फलक लावणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग : कुडाळ येथे विजेच्या धक्क्याने वीजवितरणचे कर्मचारी गंभीर घायाळ

वीज वितरण आस्थापनाकडे कोणतीही आपत्कालीन यंत्रणा नसल्याने अपघातग्रस्त कर्मचारी श्री. फाले हे ४५ मिनिटे खांबावरच लोंबकळलेल्या स्थितीत होते !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

राज्‍यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरित करणार !

इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्‍य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्‍न सभागृहात उपस्‍थित केला.

पंचगंगा नदीच्‍या पाण्‍याची वाटचाल धोक्‍याच्‍या पातळीजवळ : आंबोलीसह अनेक वाहतूक मार्ग बंद !

गेले ४ दिवस चालू असलेल्‍या पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी आता धोक्‍याच्‍या पातळी म्‍हणजे ३९ फुटांकडे वाटचाल करत आहे. २१ जुलैला नदीची पाणीपातळी ३५ फूट ४ इंच नोंदवली गेली.

प्रसिद्ध बांधकाम व्‍यावसायिक डी.एस्.के. यांच्‍या ३३५ मालमत्ता शासनाधीन !

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिक डी.एस्.के. यांच्‍या आतापर्यंत ३३५ स्‍थावर मालमत्ता शासनाधीन केल्‍या आहेत.

इगतपुरी येथे कावनई गडाचा भाग कोसळला !

कावनई गडाचा भाग कोसळला आहे. गडाच्‍या पायथ्‍याखाली ५ ते ६ घरे असल्‍याचे समजते; पण या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

राजकीय भांडवलासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालू नये ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

‘देहली येथे निर्भया हत्‍या प्रकरण घडले, त्‍या वेळी कुणाचे राज्‍य होते ?, हे आपण पाहिले नव्‍हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्‍हा मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्‍हा आपण ‘शक्‍ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.