इरशाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू !

इरशाळवाडी येथे परिसरात दुर्गंधी येत आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी रहातील ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या गटाने सत्तेमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला आहे. यामुळे मुख्यमंत्री पालटण्यात येण्याविषयी सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.

नवी मुंबईत आर्.टी.ई.च्या प्रतीक्षा सूचीतील ११७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकर प्रवेश घ्यावा ! – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी

बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये प्रतीवर्षीप्रमाणे खासगी विनाअनुदानित शाळेत एकूण पटाच्या २५ टक्के विद्यार्थांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. त्यामध्ये अर्जांवरून पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केले आहेत.  

मुंबई येथे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे ‘लेप्टो’ आजार होण्याची भीती !

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यातूनच मुंबईकरांना ‘लेप्टो’चा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश !

पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणार्‍या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. हा घाट अवजड वाहतुकीकरता पूर्णपणे बंद रहाणार आहे

शिक्षण विभागाकडून २७ शिक्षकांना नियुक्तीसाठी अंतिम संधी !

महापालिका शाळेत तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरतीमध्ये निवड होऊनही जे शिक्षक अद्याप नियुक्ती पत्र घेण्यासाठी आले नाहीत, अशा २७ शिक्षकांना शेवटची संधी म्हणून एक नोटीस पाठवण्यात येणार आहे,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट !

या भेटीत इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या ठिकाणच्या साहाय्य कार्याविषयी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या दुःखद घटनेविषयी पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त करत सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले.

सातारा येथील सैनिकाला जम्मू-काश्मीर येथे वीरमरण !

तालुक्यातील परळी भागातील सांडवली येथील सैनिक विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे परळी भागातील सांडवली गावावर शोककळा पसरली आहे.

यवतमाळ येथे पुरातील ४५ जणांना वाचवण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामानामुळे परतले !

अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरलेले आहे. ३५७ हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली आहेत. २५ गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.