शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे ! – मुख्यमंत्री

शेतकर्‍यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पुणे शहरात २ सहस्र रुपयांच्या नोटा खात्यात जमा करण्यावर भर !

नागरिकांनी नोट पालटून घेण्यापेक्षा ती खात्यात जमा करण्यास भर दिल्याचे दिसून आले. तसेच नोटा पालटून घेण्याची प्रक्रिया सोपी असल्याचेही दिसून आले.

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध !

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत.

‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा रायगड येथे शुभारंभ !

‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा शुभारंभ २१ मे या दिवशी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाला.

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज ‘भगवा’च असला पाहिजे, ही मोहीम राबवायला हवी ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

२२ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘शिवचरित्र, गडकोट मोहीम आणि हिंदवी स्वराज्य कडा पहारा’ या विषयावर येथील सत्यनारायण बजाज, सार्वजनिक वाचनालय, वर्धा येथे पू. भिडेगुरुजींचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

दगडफेक करणारे धर्मांध आणि सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.

उरूस निघाल्यानंतर त्र्यंबकेश्‍वर मंदिरात धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही ! – नितेश राणे, आमदार, भाजप

मुसलमानांना पूजा-अर्चा करायची आहे, तर सगळे जसे येतात, तसे आतमध्ये या. आरतीचे सामान घ्या. पूजेचे सामान घ्या. रांगेत उभे रहा, आतमध्ये या. सगळे जसे दर्शन घेतात, हिंदु धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा. याला कुणाचाही आक्षेप नाही.

मंदिरांच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या ५ वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपये संमत !

पर्यटनाला चालना मिळण्याचा मानस ! केवळ पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाला आध्यात्मिक लाभ होईल, या दृष्टीने मंदिरांचा विकास व्हायला हवा !

दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून संमती !

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम २०१६ द्वारा दाभोळ खाडीचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून समावेश केला आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलमार्ग २८ म्हणून ओळखले जाईल.