राजगुरुनगर नगरपरिषद भ्रष्टाचारप्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.
बीबीसीचा आतापर्यंतचा इतिहास हा हिंदुद्वेषीच आहे. त्यामुळे श्रीरामाच्या वेशभूषेतील कलाकाराला अशा प्रकारे परेड करायला लावून बीबीसीला हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवायची होती. अशा मोठ्या विदेशी वाहिन्याच्या दबावाला बळी न पडणारे रामानंद सागर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !
‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मधून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नायर रुग्णालयातील एका इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतांना ती रुग्णांसाठी खुली करण्यात आली.
बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे.
त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.
श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ! हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोव्हिड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारे पहिले स्वदेशी किट सिद्ध केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने मिळवलेले हे यशच म्हणावे लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी १० मे या दिवशी माहिती दिली.
कोरोनाचा संसर्ग असलेल्या अतीसंवेदनशील क्षेत्रामध्ये (रेड झोनमध्ये) आंबा विक्री करून येणारे वाहनचालक आणि त्यांचे सहकारी यांना गोदामात किंवा अन्य वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
इक्बालसिंह चहल यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून कामास प्रारंभ केला. त्यांनी नायर रुग्णालयाला भेट देत तेथील उपचार, तसेच रुग्णालयातील व्यवस्था आणि साधनसामुग्री यांचा आढावा घेतला.