काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंदिरांचे सोने घेण्याच्या मागणीस धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटरवरून विरोध

#CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर !

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी भारतातील हिंदूंच्या मंदिरांतील सोने १-२ टक्क्यांच्या व्याजाने कह्यात घेण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे नुकतीच केली.

त्यामुळे त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी   #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.