बकरी ईद आणि शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने गुन्हा नोंद 

बकरी ईद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे

आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि मालवणमधील त्यांचे कार्यकर्ते यांचे कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि आमदार नाईक यांचे कार्यकर्ते यांच्या कोरोनाशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या.

कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा ! – भाजपचे नेते नीलेश राणे यांची मागणी

गणेशचतुर्थीच्या काळात कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या विधानाचा शिवसेनेकडून निषेध

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले होते….

इयत्ता १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षेत सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या विद्यार्थ्यांचे सुयश

परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. अमिषा म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना मी नियमित अत्तर-कापूर लावते. यामुळे अभ्यासात एकाग्रता येत होती. अभ्यासाचा ताण किंवा झोप येत नसे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा बसवण्यात यावी ! – मनसेची मागणी

जागतिक आरोग्य संस्था आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी मान्यता दिलेले ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर बसवावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

मानखुर्द (मुंबई) येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा त्वरित काढा ! – विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

न्यायालयाच्या निर्देशानुसार मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढण्याऐवजी पोलिसांनी कु. करिश्मा भोसले यांच्या आईला भा.द.वि.च्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली.

मानाच्या पालख्यांसह मोजक्या वारकर्‍यांचे पंढरपूर येथे आगमन

मानाच्या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पंढरपूर येथे आल्या. प्रत्येक पालखीसमवेत २० मानाचे वारकरी आले होते.

येणार्‍या काळात एन्.जी.ओ.ना मोठ्या संधी असणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

केंद्रशासनाने घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामध्ये एन्.जी.ओ.ना (स्वयंसेवी संस्था) मोठ्या संधी असणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

ठाणे कारागृहातील कर्मचार्‍याला कोरोनाची लागण

ठाणे मध्यवर्ती कारागृहात २३ मे या दिवशी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ मासाने येथील एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे.