विविध करांचे अनुमाने ७७ लाख रुपये कर्मचार्यांनीच हडपले
हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते. या प्रकरणी अमर मारणे, सुनील भालेराव, आशा पोखरकर, गणेश देवरकर, महेश घुमटकर आणि काळूराम नाइकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
३१ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळात अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचार्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही कर्मचार्यांनी अपहृत रकमेपैकी ३७ लाख रुपये नगरपरिषदेच्या खात्यावर जमा केले. उर्वरित ३९ लाख ७ सहस्र ३२५ रुपये त्यांच्याकडून येणे आहे. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दोषींवर कारवाई करण्यास विलंब केल्याचा आरोपही होत आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !