धर्मादाय कार्यालयातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ! – आयुक्त

कोरोनामुळे धर्मादाय आयुक्तालयातील अनिर्णित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज चालू करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या सहा आंदोलकांवर गुन्हा नोंद

कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी देहलीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील छत्रपती संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन केले. आंदोलकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला .

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्रीतून म.फि. हुसेन यांची चित्रे वगळली !

हिंदूंनी वैध मार्गाने संघटितपणे विरोध केल्यास यश मिळते याचे हे आणखी एक उदाहरण ! याविषयी हिंदूंनी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी !

महिला आणि बालके यांची अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी राज्यात आणखी २४ प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय

महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या २ युवांवर गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषवर अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार फलटण पोलिसात नोंदवण्यात आली.

कामकाजात मराठी भाषेचा उपयोग करत नसल्यावरून राज्यशासनाकडून कोकण रेल्वे प्रशासनाकडे विचारणा

केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदी आणि इंग्रजी यांसह राज्याच्या प्रादेशिक भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे.  

हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान करून चित्रपटाची निर्मिती करावी ! – आमदार राम कदम, भाजप

हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान करून चित्रपटाची निर्मिती करावी, असे आवाहन भाजपचे आमदार राम कदम यांनी केले आहे.

मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीस असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवणार ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महानगरपालिका

कोरोनाची चाचणी करण्यास असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे

चारचाकी दरीत कोसळून युवती ठार, दोनजण घायाळ

सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.