अभिनेता सैफ अली खान यांनी सीतामातेच्या अपहरणाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण
मुंबई, ६ डिसेंबर (वार्ता.) – प्रभु श्रीराम यांनी धर्माची स्थापना केली. श्रीराम आणि रावण यांच्यामधील युद्ध म्हणजे धर्म अन् अधर्म यांतील लढाई होती. सैफ अली खान ‘रावणाची भूमिका नायकाप्रमाणे साकारेन. चित्रपटाच्या माध्यमातून रावणाला न्याय मिळवून देईन’, असे म्हणत आहेत; पण हे कसे काय शक्य आहे ? चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक यांनी हिंदूंच्या श्रद्धेचा सन्मान करून चित्रपटाची निर्मिती करावी, असे आवाहन भाजपचे आमदार राम कदम यांनी केले आहे.
फ़िल्मजगत को बार बार हिन्दू देवी देवता हमारी आस्था और श्रद्धा ही क्यों पीड़ित करने के लिए याद आती हैं क्या हिन्दू भाई मर्यादा में रहते हुए सयमी हैं ? यही कारण हैं ? भविष्य में ना हिन्दू भाई सहेगा नाही कोई और धर्म का भाई. किसी को भी किसी धर्म की भावनाएं आहत करनेका अधिकार नहीं
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 6, 2020
चित्रपट निर्माता भूषण कुमार यांच्या येत्या चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेच्या अनुषंगाने सैफ अली खान यांनी रावणाचे उदात्तीकरण करतांना सीतामातेच्या अपहरणाचे समर्थन करणारे वक्तव्य केले. यावर आमदार राम कदम यांनी ‘ट्वीट’द्वारे वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘We will make Ravan humane, justify his abduction of Sita’: Saif Ali Khan on his role of ‘Lankesh’ in upcoming movie ‘Adipurush’https://t.co/EbkKxlkKSA
— OpIndia.com (@OpIndia_com) December 5, 2020