दौंड (जिल्हा पुणे) – दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्या महिला आणि तरुण यांवर प्राणघातक आक्रमण प्रकरणातील संशयित आरोपी तथा दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख अन् त्याचा सहकारी रमजान याला पोलिसांनी राजस्थान मधून २९ नोव्हेंबर या दिवशी कह्यात घेतले आहे. बादशाह शेख याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बारामती सत्र न्यायालयात अर्ज केला होता; परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता. पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी ४ आरोपींना अटक केली आहे.
दौंडच्या बहुचर्चित ॲट्रॉसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याला राजस्थानमधून अटकhttps://t.co/UkV0dgr2x0
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) November 29, 2022
पीडितेच्या तक्रारीनुसार बादशहा शेख याच्यासह एकूण २० जणांविरुद्ध ९ नोव्हेंबर या दिवशी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी १७ नोव्हेंबरला बादशहा शेख याच्या अटकेच्या मागणीसाठी दौंड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. श्री. राणे यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी आणि काही पोलीस अधिकार्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा जाहीर आरोप केल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे तडकाफडकी मुख्यालयात स्थानांतर करण्यात आले होते.