तासिका तत्त्वावरील शिक्षकांची मानधनात वाढ करण्याची मागणी

तासिका तत्त्वावरील शिक्षकांना अंगणवाडी शिक्षिका आणि सफाई कामगार यांच्यापेक्षा अल्प मानधन असल्याने उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूंत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर गुन्हे नोंदवा !

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आली. 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर ‘महाराष्ट्र रत्न २०२४’ पुरस्काराने सन्मानित !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती यांचे सहअध्यक्ष आणि औसा येथील नाथ संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘आफ्टरनून व्हॉईस मुंबई’ यांच्याकडून ‘महाराष्ट्र रत्न २०२४’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापीठ स्तरावर अभ्यास चालू ! – ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर

आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापिठाच्या स्तरावरून अभ्यास करत आहे.

दौंड (पुणे) येथील मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकावणार्‍या जिहाद्यांवर कारवाई करण्याची मागणी !

पैगंबर जयंती निमित्त दौंड येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काही धर्मांधांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मिरज येथील महाराणा प्रताप चौक येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जाहीर ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात विविध कामांना वेग !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सिद्धता जोरात चालू असून स्वच्छतेसह अन्य कामे वेगात चालू आहेत. मुख्य मंदिराच्या समोर असलेला गरुड मंडप उतरवण्याचे काम पूर्ण झाले असून येथील स्वच्छताही २ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीयुक्त तेल मिसळणार्‍यांवर कारवाई करावी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराची स्वच्छता आणि रंगरंगोटी !

३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे, तसेच मुख्य मंदिरासह विविध शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. २४ सप्टेंबरला सायंकाळी देवीची मंचकी निद्रेला प्रारंभ झाला.

वक्फ बोर्डाच्या कायद्यातील सुधारणेविषयी विरोधकांनी अपप्रचार बंद करावा ! – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री

वक्फ बोर्डाच्या जागांचा अवैध आणि अपवापर बंद व्हावा, तसेच या जागा मुसलमानांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात याव्यात, यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरील सुनावणी आता विशेष न्यायालयात होणार !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीची फौजदारी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. आता या तक्रारीची सुनावणी ‘एम्.पी.एम्.एल्.ए.’ या विशेष न्यायालयामध्ये होणार आहे.