शिवमोग्गा येथे धर्मांधांची गुंडगिरी सहन केली जाणार नाही ! – कर्नाटकचे मंत्री ईश्‍वरप्पा यांची चेतावणी

शिवमोग्गा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉक्टरांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाला कर्नाटक राज्यातून १६८ डॉक्टर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आम्ही नियमितपणे यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू असे कळवले होते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायद्याची बाराखडीही ठाऊक नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले

ध्वनीवर्धकातून निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक प्रमाणात ध्वनी येत असल्याच्या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई न केल्याने कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि अधिकारी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण

बजरंग दलाचे श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी  शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. आक्रमणामागील कारण समजू शकलेले नाही. श्री. नागेश हे गोरक्षण, धर्मांतर रोखणे आदी धर्मकार्यात आघाडीवर असतात.

भाजपची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगावात

भारतीय जनता पक्षाची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगाव शहरात होत आहे.

हासन (कर्नाटक) येथे पोलिसांच्या उपस्थितीत महिला पत्रकारावर धर्मांध कसायांचे आक्रमण

महिला पत्रकाराने घटनास्थळी जाऊन अवैध पशूवधगृह उघडण्याची मागणी केल्यावर येथे जमलेल्या धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

स्वतःसाठी जोडीदाराची निवड करणे हा कोणत्याही सज्ञान व्यक्तीचा मूलभूत अधिकार ! – कर्नाटक उच्च न्यायालय

याचिकाकर्ते सॉफ्टवेअर इंजिनीयर वजीद खान यांनी सॉफ्टवेअर इंजिनीयर राम्याशी विवाह केला. महिला संरक्षण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या राम्याला न्यायालयासमोर उपस्थित करून तिची सुटका करण्याची मागणी वजीदने केली होती.

कोणत्याही जातीचा उमेदवार देऊ; पण मुसलमान उमेदवार देणार नाही ! – के.एस्. ईश्‍वरप्पा, भाजप, ग्रामविकासमंत्री, कर्नाटक

आम्ही हिंदु समुदायातील कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. कुरुबा, लिंगायत, वोक्कलिगा किंवा ब्राह्मण समाजातील कोणत्याही व्यक्तीला तिकीट देऊ; मात्र एक गोष्ट नक्की आहे की मुसलमानांना आम्ही तिकीट देणार नाही

मंगळुरू येथे आणखी एका ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण

पोलिसांनी पहिल्यांदा लिखाण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा दुसर्‍या ठिकाणी लिखाण झाले नसते ! आताही पोलीस निष्क्रीय राहिले, तर सर्वत्रच असे लिखाण करण्यात येऊ शकते !