नूंह हिंसाचारामागे काँग्रेस ! – अनिल विज, गृहमंत्री, हरियाणा
भारताच्या फाळणीपासून देशात झालेल्या दंगलींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे दिसून आलेले आहे. अशा काँग्रेसला हिंदूंनी राजकीय धडा शिकवला असतांनाही तिला जाग आलेली नाही. काँग्रेसचा राजकीय विनाश हा मुसलमानांमुळेच झाल्यास आश्चर्य वाटू नये !