|
नूंह (हरियाणा) – येथे ३१ जुलै या दिवशी झालेल्या हिंसाचारासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोनू मानेसार यांना उत्तरदायी ठरवण्यात येत आहे. ‘त्यांनी फेसबुकवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने हिंसा भडकली’, असा त्यांच्यावर आरोप आहे. अशातच नूंह येथील अतिरिक्त पोलीस उपायुक्त ममता सिंह यांनी म्हटले आहे की, नूंह येथील हिंसेमध्ये गोरक्षक मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगी यांची कोणतीच भूमिका नव्हती. बिट्टू बजरंगी यांची अटक नूहंमध्ये हिंसा भडकावण्यामुळे करण्यात आलेली नाही. ममता सिंह यांनी हिंसेच्या वेळी नल्हड मंदिरात अडकलेल्या हिंदूंना धर्मांध मुसलमानांच्या जमावापासून वाचवले होते.
नूंह हिंसा पर हरियाणा की एडीजीपी ममता सिंह का बड़ा बयान सामने आया है, सिंह ने मोनू मानेसर को क्लीन चिट दे दी है. उन्होंने कहा कि गोरक्षक मोनू मानेसर का बयान ‘भड़काऊ नहीं’ है. सिंह ने एक चैनल से बातचीत में कहा, “मोनू मानेसर ने कहा था मैं यात्रा में आ रहा हूं, आप भी आइए. यह भड़काऊ… pic.twitter.com/0kb7utw5eN
— Millat Times (@Millat_Times) August 22, 2023
ममता सिंह पुढे म्हणाल्या की, जर ३१ जुलैच्या आधी मोनू मानेसर याने सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केलेले ध्वनीमुद्रण एकेले, तर त्यात त्याने एवढेच म्हटले आहे की, ‘मी यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहे. आपणही यात सहभागी व्हा.’ हे भडकावणारे वक्तव्य असू शकत नाही.
बिट्टू बजरंगी यांच्या अटकेवर सिंह म्हणाल्या की, हिंसेसाठी त्याला अटक करण्यात आलेली नाही. दोन वेगवेगळी सूत्रे आहेत. भडकावणारा मजकूर प्रसारित केल्यासाठी फरीदाबाद पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. दुसरीकडे नूंह पोलिसांनी त्याला अटक करण्यामागे ‘त्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्याशी केलेले भांडण’, हे कारण होते.