मशिदीच्या भोंग्यांवरून मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक चिथावणी देणार्‍या इमामावर गुन्हा नोंद

नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)

नूंह (हरियाणा) – येथे ३१ जुलै या दिवशी ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी नल्हड गावातील महंमद पुरिया या मशिदीच्या इमामाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फजरू मिया नावाच्या या इमामाने ३१ जुलै या दिवशी मशिदीच्या भोंग्यावरून ‘हिंदु येथील नल्हड मंदिराजवळील मुसलमानांची दुकाने लुटत आहेत’, असे खोटेच सांगितले. यानंतर मुसलमान तरुण मोठ्या संख्येने येथे गोळा झाले आणि त्यांनी हिंदूंच्या वाहनांना आगी लावल्यो, तसेच हिंदूंच्या दुकानांची लुटालूट केली.

संपादकीय भूमिका

  • मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !
  • वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरूनच ‘हिंदु पुरुषांनी त्यांच्या बायका आणि संपत्ती सोडून काश्मीरमधून चालते व्हावे’ अशी धमकी देण्यात आली होती, हे हिंदूंनी विसरू नये !