|
चंडीगड – नूंह येथील हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या अन्वेषणाच्या निष्कर्षावरून हेच लक्षात येते की, या हिंसाचाराला काँग्रेस उत्तरदायी आहे. फिरोजपूर झिरका येथील काँग्रेसचे आमदार मम्मन खान यांच्या विरोधात पुरावे सापडले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी चालू असून त्यातही या हिंसाचारात काँग्रेसचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिली. पोलिसांनी मम्मन खान यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी नोटीसही पाठवली आहे. या हिंसाचारात ७ जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत ५०० जणांना अटक करण्यात आली आहे.
‘Congress behind #Nuh violence’, alleges #Haryana home minister Anil Vijhttps://t.co/9PE1Uf3yAK pic.twitter.com/A5BGFaBiQh
— Hindustan Times (@htTweets) August 29, 2023
अनिल विज यांच्या विधानावर काँग्रेसने राज्याच्या विधानसभेत आक्षेप घेत गदारोळ केला. काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. गदारोळामुळे २ घंट्यांसाठी कामकाज स्थगित करण्यात आले. (सातत्याने होणार्या गदारोळांमुळे संसद आणि राज्यांच्या विधानसभा यांचे कामकाज स्थगित करण्यात येणारा जगातील एकमेव देश भारत, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! यातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असतांनाही गदारोळ रोखून कामकाज कसे करता येईल ?, यावर उपाययोजना न काढणारे लोकप्रतिनिधी लोकशाहीद्रोहीच होत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारताच्या फाळणीपासून देशात झालेल्या दंगलींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे दिसून आलेले आहे. अशा काँग्रेसला हिंदूंनी राजकीय धडा शिकवला असतांनाही तिला जाग आलेली नाही. काँग्रेसचा राजकीय विनाश हा मुसलमानांमुळेच झाल्यास आश्चर्य वाटू नये ! |