चोराने क्षमा मागत असल्याची चिठ्ठी लिहून परत केल्या चोरलेल्या लसी !

‘सॉरी, मला ठाऊक नव्हते की, यात कोरोनाचे औषध आहे’,

जींद (हरियाणा) येथील सरकारी रुग्णालयातून कोरोना लसींचे १ सहस्र ७०० डोस चोरीस !

आज देशात ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर या गोष्टींचा तुटवडा असल्याने त्यांच्या चोर्‍या केल्या जात आहेत. पुढील भीषण आपत्काळात लोकांना अन्न-पाणीही मिळण्यास दुर्मिळ झाल्यावर याहून भयावह अराजकता निर्माण होऊ शकते.

निकिता तोमर हत्याकांडाच्या प्रकरणी दोघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा

हिंदु विद्यार्थिनी निकिता तोमर हिची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी जलद गती न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

फरीदाबाद आणि मथुरा येथील ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

(म्हणे) ‘भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही !’ – शेतकरी नेते राकेश टिकैत यांची टीका

समाजविघातक शक्तींना शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेणारे, देशद्रोही खलिस्तानवाद्यांच्या जिवावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरणारे कथित शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रभु श्रीरामचंद्रांविषयी काही बोलणे, हेच मुळात हास्यास्पद आहे !

शेतकरी आंदोलन चालू ठेवण्यासाठी पैसा आणि मद्य पुरवा !  

हरियाणातील काँग्रेसच्या महिला नेत्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन ! अशा प्रकारची विधाने केवळ काँग्रेस नेत्यांकडूनच होऊ शकतात ! शेतकर्‍यांचे आंदोलन प्रायोजित आहे, असे आरोप आधीपासून होत असतांना ते सत्य आहेत, असेच यातून स्पष्ट होते !

फरिदाबाद येथे फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती अखंड कार्यरत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येतात. या हिंदु राष्ट्र जागृती सभांचा मुख्य उद्देश ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना संघटित करणे’, हा आहे.

हरियाणातील गावामध्ये प्रवेश करण्यास भाजप आणि जजपा यांच्या नेत्यांना बंदी

चरखी दादरी जिल्ह्यातील एका गावात सत्ताधारी भाजप आणि आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या (जजपा) नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

कर्नाल (हरियाणा) येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध

येथील कैमला गावामध्ये भाजपकडून महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला मुख्यमंत्री खट्टर उपस्थित रहाणार होते. त्या वेळी ही घटना घडली.

भगवद्गीतेतील मार्गदर्शन आजही उपयुक्त ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

तणावपूर्ण जीवनशैलीमधून बाहेर येण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेले मार्गदर्शन आजही तेवढेच उपयुक्त आहे. सध्याची समाजव्यवस्था  व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करणारी आहे.