वडोदरा (गुजरात) – येथील ‘पारुल’ या खासगी विद्यापिठातील ४ परदेशी विद्यार्थ्यांवर बूट घालून दर्ग्यात प्रवेश केल्याच्या आरोपावरून स्थानिक लोकांनी मारहाण केली. परदेशी विद्यार्थ्यांना गुजराती भाषा समजत नसल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, अशी माहितीही पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. तसेच २ अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली. मारहाण करण्यात आलेले विद्यार्थी थायलंड, सुदान, मोझांबिक आणि ब्रिटन या देशांतील आहेत.