नवी देहली – गोध्रा घटनेनंतर गुजरातमधील वडोदरा गावात झालेल्या दंगली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ६ हिंदूंना निर्दोष मुक्त केले. याविषयीच्या निकालात सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपिठाने म्हटले की, गुन्ह्याच्या ठिकाणी केवळ उपस्थित असणे हे एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवण्याचे कारण असू शकत नाही.
१. वर्ष २००२ मध्ये झालेल्या या दंगलीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला आणि ७ जणांना अटक केली होती.
२. वर्ष २००५ मध्ये विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष सोडले होते; परंतु २०१६ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने त्यांपैकी ६ जणांना दोषी ठरवले होते.
३. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रहित केला आणि म्हटले की, या आरोपींकडे दंगल भडकवण्यासाठी वापरलेली कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत किंवा पुरावे सापडले नाहीत.
४. खंडपिठाने म्हटले की, ‘एका निर्दोष व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेणे चुकीचे आहे.’ या निर्णयामुळे याचिकाकर्ते धीरूभाई भैलालभाई चौहान आणि इतर यांना दिलासा मिळाला आहे.
संपादकीय भूमिका२३ वर्षांनी मिळालेला न्याय हा एकप्रकारे अन्यायच आहे, असे समाजाला वाटल्यास चूक ते काय ? |