Gujarat Drug Smuggling : गुजरातमधील समुद्रात १ सहस्र ८०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

पोरबंदर (गुजरात) – येथील बंदरापासून १९० कि.मी. दूर समुद्रात एका नौकेत भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत १ सहस्र ८०० कोटी रुपयांचे ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. हे अमली पदार्थ ‘मेथाम्फेटामाइन’ असू शकते, असे म्हटले जात आहे. पथकाने या संशयित नौकेला थांबण्यास सांगितल्यावर त्यातील लोकांनी अमली पदार्थ समुद्रात फेकून दिले आणि ते नौका घेऊन पळून गेले. यानंतर पथकाने समुद्रात टाकलेले अमली पदार्थ कह्यात घेतले. हे अमली पदार्थ तस्कर पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

पकडण्यात आलेले अमली पदार्थ इतके आहे, तर देशात न पकडण्यात आलेले अमली पदार्थ किती असेल, याची कल्पनाच करता येत नाही !