वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे. याविषयी अपहाराची कोणती तक्रार असेल, तर शासनाला त्याची माहिती द्या. वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.

चिंचवड येथील महात्मा फुले उद्यानातील २२ झाडे ठेकेदाराने विनाअनुमती तोडली !

तोडलेली झाडे पुन्हा जोडता येत नाहीत, त्यामुळे ठेकेदाराच्या या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक !

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करतांना ४ वाहने जप्त !

अक्कलकोट परिमंडळाअंतर्गत असलेल्या मैंदर्गी आणि वागदरी नियतक्षेत्रात अनुमतीविना वृक्षतोड करून त्याची अवैधरित्या वाहतूक करतांना लाकडांसह ४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

आंदोलक झाडावर चढून आंदोलन करत असल्याने बीड प्रशासनाने ३ झाडे तोडली !

झाडावर चढून कुणी आंदोलन करू नये; म्हणून झाडच तोडणार्‍या प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडवण्याची अपेक्षा काय करणार ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

मूळ समजण्यास कठीण ज्ञान – औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर त्या पानांतून प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे.

पुणे शहरात ‘होर्डिंग’ लावण्यासाठी सर्रास वृक्षतोड !

शहरात अनधिकृत आकाशचिन्ह फलक (होर्डिंग) लावणार्‍यांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याचा नियम महापालिकेने केला आहे; पण शहरात अनेक होर्डिंग व्यावसायिकांनी सर्रास झाडांच्या फांद्या तोडून मोठमोठे होर्डिंग लावले आहेत.

देशी झाडांच्या ३ लाख बियांचे संकलन करून त्यांचे विनामूल्य वाटप करणारे लातूर जिल्ह्यातील शिवशंकर चापुले !

‘निसर्गाकडे केवळ मौजमजा म्हणून पहाणार्‍या आणि फिरणार्‍या व्यक्तींनी स्वत:च्या नियोजनबद्ध कृतीतून वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करावा’, असे आवाहन शिवशंकर चापुले यांनी केले आहे.

भीषण आपत्काळात औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करा !

भीषण आपत्काळात अल्पमोली अन् बहुगुणी असलेल्या आयुर्वेदीय औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक आहे.

३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी विधीमंडळ समिती घोषित

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधीमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.