Mango Festival In Delhi : देहलीत ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी आंबा महोत्सव; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन !

नरेंद्र मोदी

मुंबई – देहली येथे ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेवरून हा आंबा महोत्सव होणार आहे. देवगड आणि रत्नागिरी येथून हापूस आंबे, तसेच कोकणातील विविध उत्पादने या प्रदर्शनात असणार आहेत. ३० एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.